Sunday, September 07, 2025 03:04:51 AM

भारतीय 'अ' संघाने जिंकली दुलीप ट्रॉफी

भारतीय 'अ' संघाने दुलीप ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय 'क' संघावर प्रभावी विजय मिळवून प्रतिष्ठित किताबावर आपले नाव कोरले आहे.

 भारतीय अ संघाने जिंकली दुलीप ट्रॉफी

आंध्रप्रदेश - भारतीय 'अ' संघाने दुलीप ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय 'क' संघावर प्रभावी विजय मिळवून प्रतिष्ठित किताबावर आपले नाव कोरले आहे. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला, ज्यात भारतीय 'अ' संघाने १३२ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय क संघाकडून साई सुदर्शनने शतकी खेळी केली. मात्र ही खेळी संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही.

गायकवाडला पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही. मात्र दुसऱ्या डावात ४४ धावा केल्या. भारतासाठी शाश्वत रावतने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. भारत अ संघाने पहिल्या डावात २९७ धावा केल्या. यादरम्यान शाश्वतने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने २५० चेंडूंचा सामना करत १२४ धावा केल्या. शाश्वतच्या या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. आवेश खानने नाबाद राहत अर्धशतक झळकावले. त्याने ६८ चेंडूत ५१ धावा केल्या. यानंतर भारतीय अ संघाने ८६ धावांवर दुसरा डाव घोषीत केला.

सुदर्शनचं शतक ठरलं व्यर्थ 

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया क संघाने पहिल्या डावात २३४ धावा केल्या. यादरम्यान अभिषेक पोरेलने ८२ धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार मारले. रजत पाटीदार शून्यावर बाद झाला. साई सुदर्शन १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क संघ दुसऱ्या डावात २१७ धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार गायकवाडने ४४ धावांचे योगदान दिले. तर सुदर्शनने शतक झळकावले. त्याने २०६ चेंडूत १११ धावा केल्या. तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

महत्त्वाचे मुद्दे -
 

  • भारतीय 'अ' संघाने जिंकली दुलीप ट्रॉफी
  • भारतीय 'क' संघावर मिळवला १३२ धावांनी विजय

सम्बन्धित सामग्री