गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची कोकणात येण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात मोठ्या संख्येने गणेशभक्त येऊ लागले आहेत. मात्र गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे एरवी कोकणात पोहोचताना काही तासांत पोहोचतात तर आता या खड्ड्यातूनच प्रवास करताना अधिक वेळ लागतोय.