Sunday, August 31, 2025 06:31:45 AM

Ameet Satam : भाजपमध्ये मोठे फेरबदल ! मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम, मुख्यमंत्र्यानी केली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

ameet satam  भाजपमध्ये मोठे फेरबदल  मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम मुख्यमंत्र्यानी केली घोषणा
ameet satam

भाजपने सोमवारी आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे.  

हेही वाचा - Maharashtra Rain Update : पुढील 24 तास धोक्याचे ! हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या 

अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 

हेही वाचा - Delhi Crime : बायकोला जिवंत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपी विपिन भाटीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सासू अटकेत

15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. 2014 पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  


सम्बन्धित सामग्री