उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी झालेल्या 26 वर्षीय निक्कीच्या हत्येतील मुख्य आरोपी आणि पती विपिन भाटीला पोलिसांनी 24ऑगस्ट 2025 न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी विपिनला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले की, निक्की हत्याकांड प्रकरणात तिच्या सासूलाही अटक करण्यात आली आहे.
हुंडा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विपिन भाटीने रविवारी कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिस चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.मृत निक्कीच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की 2016 मध्ये तिच्या लग्नापासून, निकीच्या सासरच्या लोकांनी स्कॉर्पिओ गाडी आणि मोटारसायकलची मागणी पूर्ण केली असली तरी, तिला 36 लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीसाठी छळले जात होते.
हेही वाचा - Greater Noida Dowry Murder Case: पत्नीला जाळून मारणाऱ्या आरोपी विपिनचे पोलिसांकडून एन्काउंटर; पायावर झाडली गोळी
आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, निक्की मारहाण करताना दिसले. तसेच इतर काही व्हिडीओमध्ये निक्की आगीच्या ज्वाळांनी वेढलेली आणि पायऱ्यांवरून खाली उतरताना पाहायला मिळाली. गुरुवारी रात्री रुग्णालयात नेत असताना निक्कीचा मृत्यू झाला.दरम्याने पोलिसांनी याप्रकरणी मृत निक्कीच्या पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Crime: पतीने पत्नीच्या डोक्यात रॉड घातला गळफास लावून स्वत:लाही संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ग्रेटर नोएडातील कसना पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम 103(1) (खून), 115 (2) (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 61 (2) (आजीवन कारावास किंवा इतर शिक्षेची शिक्षा असलेला गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.