राज्यात 2 पावसाने उसंत घेतली होती. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दमदार हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. पुढील दोन दिवसात राज्यात परत एकदा पावसाचा जोर असेल.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज कोकण आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच जोरदार पाऊस सुरू आहे.
हेही वाचा - Delhi Crime : बायकोला जिवंत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपी विपिन भाटीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सासू अटकेत
सकाळी चार वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. काही तासांच्या पावसामध्येच पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा थेट परिणाम हा मुंबईच्या लोकल सेवेवर झाला होता. रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रशासनाकडून सध्या पावसाचा जोर पाहता उपायोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.
हेही वाचा - Adinath Kothare : आता छोट्या पडद्यावर झळकणार आदिनाथ कोठारे; 'या' मालिकेतून करणार दमदार पदार्पण
त्यामुळे आज पावसाचा जोर असाच राहिला तर मागील आठवड्यासारखी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनदेखील योग्य उपायोजना करत आहे.