Earthquake In Tonga Island: म्यानमार आणि थांयलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाची घटना ताजी असताना आता आणखी एका देशाला भूकंपाचा तडाखा बसला आहे. रविवारी संध्याकाळी 5.48 वाजता नैऋत्य प्रशांत महासागरातील टोंगा बेटांवर 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे प्रशांत महासागर क्षेत्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे, असे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने म्हटले आहे.
यूएसजीएसने म्हटले आहे की, भूकंप टोंगाच्या मुख्य बेटापासून सुमारे 100 किलोमीटर ईशान्येस झाला. पॅसिफिक त्सुनामी केंद्राने इशारा जारी केला आहे की, भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर अंतरावरील किनारी भागात धोकादायक लाटा येऊ शकतात. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही.
हेही वाचा - Myanmar-Bangkok Earthquake: म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या महाविनाशकारी भूकंपात आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू
टोंगा हा एक पॉलिनेशियन राष्ट्र आहे, ज्यामध्ये 171 बेटे असून त्याची लोकसंख्या 1,00000 पेक्षा जास्त आहे. यातील बहुतेक लोक टोंगाटापूच्या मुख्य बेटावर राहतात. हे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यापासून 3500 किलोमीटर पेक्षा जास्त पूर्वेस आहे. टोंगा बेट सरोवर आणि चुनखडीच्या कड्यांनी वेढलेले आहे.
म्यानमार-थायलंडमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान -
शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली, तर म्यानमारमध्ये लाखो लोक बेघर झाले. सध्या म्यानमारमध्ये मृतांचा आकडा 1700 च्या वर गेला आहे. ढिगारा हटवला जात असताना मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे सांगण्यात येत आहे. म्यानमारमधील भूकंपानंतर, तेथील लष्करी सरकारने राजधानी नायपिताव आणि मंडालेसह सहा प्रदेश आणि राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली.
हेही वाचा - म्यानमारध्ये भूकंपाचा तडाखा! भूकंपात 144 बळी, 30 लाख विस्थापित
भूंकपग्रस्त देशांना भारताचा मदतीचा हात -
दरम्यान, भारत सरकारने म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी पाच लष्करी विमानांद्वारे मदत साहित्य, बचाव पथके आणि वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत. म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने कारवाई करत मदत मोहीम सुरू केली, ज्याला ऑपरेशन ब्रह्मा असे नाव देण्यात आले आहे.