ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियन सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीच्या निर्णयात मोठा बदल करत YouTube चा देखील समावेश केला आहे. यापूर्वी या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मला वगळण्यात आले होते, मात्र आता सरकारने पूर्वीचा निर्णय बदलत यूट्यूबलाही या बंदीच्या यादीत टाकले आहे.
एका सरकारी अहवालानुसार, 10 ते 15 वयोगटातील 37% मुलांनी YouTube वर हानिकारक कंटेंट पाहिल्याची कबुली दिली आहे. ही आकडेवारी इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे पालक संघटनांकडून आणि तज्ज्ञांकडून दबाव वाढल्याने सरकारने YouTubeवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - AI तुमच्या बँक बॅलन्सवर लक्ष ठेवून आहे? आवाजाची नक्कल करून फसवणूक करू शकते, सॅम ऑल्टमन यांचा इशारा
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले की, सोशल मीडियाचा मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहे. आता त्यांना वाचवण्याची वेळ आली आहे. हा कायदा डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. तथापी, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना 49.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावला जाणार आहे.
हेही वाचा - मायक्रोसॉफ्टने 15 हजार लोकांना कामावरून कमी केल्यानंतर सत्य नाडेला यांचं पत्र; भविष्याबद्दल हे सांगितलं
दरम्यान, YouTube कंपनीने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की ते सोशल मीडिया नसून एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. परंतु, तरी ते सरकारशी सहकार्य करण्यास तयार आहेत. तथापी, सरकारने हेही स्पष्ट केले आहे की ही बंदी ऑनलाइन गेम्स, मेसेजिंग अॅप्स आणि शैक्षणिक व आरोग्यविषयक वेबसाइट्सवर लागू होणार नाही. हा निर्णय सोशल मीडिया आणि मुलांच्या डिजिटल संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा पायंडा ठरू शकतो.