Sunday, August 31, 2025 04:48:56 AM

डोनाल्ड ट्रम्प आयकर रद्द करणार? देश चालवण्यासाठी 'या' देशांवर करणार वसुली!"

मेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील आयकर संपूर्णपणे रद्द करण्याचा विचार मांडला आहे, ज्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.

 डोनाल्ड ट्रम्प आयकर रद्द करणार  देश चालवण्यासाठी या देशांवर करणार वसुलीquot

भारतात वेगवेगळे करप्रकार आहेत आणि त्यात आयकर हा नेहमी चर्चेचा विषय असतो. अशा वेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील आयकर संपूर्णपणे रद्द करण्याचा विचार मांडला आहे, ज्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.

आयकर ऐवजी इतर देशांवर शुल्क?
27 जानेवारी रोजी फ्लोरिडामध्ये झालेल्या ‘रिपब्लिकन इश्यूज कॉन्फरन्स’ (Republican Issues Conference) दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेतील करप्रणाली बदलण्याचा प्रस्ताव दिला. त्यांच्या मते, जर अमेरिकन नागरिकांवरील कर हटवला तर त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. मात्र, सरकारला लागणारा महसूल ते इतर देशांवर आयात शुल्क लादून मिळवण्याच्या विचारात आहेत.

ट्रम्प यांची भूमिका
ट्रम्प म्हणाले की, 1913 पूर्वी अमेरिकेत आयकर नव्हता. त्या काळात आयात शुल्काच्या मदतीने देशाने मोठी आर्थिक प्रगती केली. 1870 ते 1913 हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात संपन्न काळ होता आणि याच मॉडेलवर पुन्हा जाण्याची गरज आहे, असे त्यांचे मत आहे.

हेही वाचा👉🏻 बाजारात डिजिटल रुपया! मोबिक्विक आणि क्रेडची नवी क्रांती; सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा?

अमेरिकन अर्थव्यवस्थेवर परिणाम
या प्रस्तावाचे अमेरिकन नागरिक स्वागत करत असले तरी अर्थतज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. परदेशी उत्पादनांवर जास्त शुल्क लादल्यास आयातीवर परिणाम होईल आणि अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा👉🏻 अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प, भारतासाठी संधी की आव्हान?

भारतावर काय परिणाम?
जर ट्रम्प यांनी हा प्रस्ताव अंमलात आणला, तर त्याचा भारतासह अनेक देशांवर परिणाम होईल. भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसू शकतो, कारण अमेरिका आयटी सेवा, औषधे आणि वस्त्रोद्योगासाठी मोठी बाजारपेठ आहे. जर भारतानेही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवले, तर देशांतर्गत महागाई वाढू शकते.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री