Tuesday, September 02, 2025 05:45:07 AM

Girl Sells Mothers Jewellery : 700 रुपयांच्या किरकोळ खरेदीसाठी मुलीनं विकले आईचे सव्वा कोटीचे दागिने!

मुलीने किरकोळ खरेदीसाठी आईचे कोट्यवधींचे दागिने विकल्याचे समोर आले आहे. या मुलीला त्या दागिन्यांची किंमत माहिती नव्हती, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी काही वेळात हे दागिने परत मिळवून दिले.

girl sells mothers jewellery  700 रुपयांच्या किरकोळ खरेदीसाठी मुलीनं विकले आईचे सव्वा कोटीचे दागिने

Girl sells mothers jewellery : चीनमधील शांघायमध्ये एका किशोरवयीन मुलीने लिप स्टड आणि कानातले खरेदी करण्यासाठी तिच्या आईचे 1.02 दशलक्ष युआन (म्हणजे 1.22 कोटी रुपये) किमतीचे दागिने फक्त 60 युआन (721 रुपये) मध्ये विकल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनमधील वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांग या महिलेच्या किशोरवयीन मुलीने घरातील मौल्यवान दागिने जसे की जेड ब्रेसलेट, नेकलेस आणि महागडी रत्ने असलेले दागिने स्थानिक बाजारात जाऊन विकले. या किशोरवयीन मुलीला हे दागिने नकली असल्याचे वाटल्याने तिने ते अगदी स्वस्तात जेड रिसायकलिंग दुकानात जाऊन विकले.

हेही वाचा - Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'

वांग हिने पोलि‍सांना सांगितले की, 'मला काहीही कल्पना नाही की तिला ते का विकायचे होते. ती म्हणाली की तिला त्या दिवशी पैसे हवे होते. मी तिला कितीला विकलं म्हणून विचारलं, तर तिने मला सांगितलं की, ‘60 युआन.’ मी तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणली की, ‘मी कोणालातरी लिप स्टड्स वापरल्याचे पाहिलं होतं, आणि मला वाटलं की ते भारी दिसतात. मलापण ते हवे होते.'
पुढे बोलताना ती म्हणाली की, 'तिने सांगितलं की, लिप स्टडची किंमत जवळपास 30 युआन असते आणि ते मला 30 युआनमध्ये कानातले देखील देतील, त्यामुळे एकूण 60 युआन.'

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मार्केट व्यवस्थापनाशी देखील संपर्क साधला. काही तासांनंतर त्यांनी वांग यांच्या मुलीने विकलेल्या वस्तू शोधून काढल्या आणि त्या वांग यांना परत करण्यात आल्या.

दरम्यान, या घटनेनंतर चायनीज सोशल मीडियावर चर्चेला सुरूवात झाली आहे. काही जणांनी अल्पवयीन मुलीबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे. काही जणांनी मुलीशी योग्य संवाद नसल्याच्या मुद्द्यावरून पालकांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - Woman's Success Story : घटस्फोटानंतर कमाई झाली तिप्पट.. आता मिळवतेय तब्बल 9 कोटी रुपये वेतन


सम्बन्धित सामग्री