Monday, September 01, 2025 02:35:20 PM

पाकिस्तान बनला 'आतंकिस्तान'.. जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा 'विश्वविक्रम'

पाकिस्तानच्या डोक्यावर आता दहशतवादी देशाचा 'मुकुट' चढला आहे. हा देश जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जाणून घेऊ, दहशतवादात पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे..

पाकिस्तान बनला आतंकिस्तान जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा विश्वविक्रम

इस्लामाबाद: जागतिक दहशतवाद निर्देशांक-2025 अहवालात पाकिस्तान जगातील देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षानुवर्षे दहशतवाद्यांना पोसणारा मोहम्मद अली जिन्नांचा देशाला आता स्वतःच्याच कर्माची फळे भोगावी लागत आहेत. पण इतक्या वाईट पद्धतीने दहशतवादाचा घास बनल्यानंतरही त्याचा पाकिस्तानच्या धोरणांवर काही परिणाम झालेला नाही. जागतिक दहशतावाद निर्देशांकाच्या या यादीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे हजाराहून अधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत.

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने जागतिक दहशतवाद निर्देशांक प्रकाशित केला आहे. हा गेल्या 17 वर्षांचा आलेख दर्शवतो. या अहवालात, दहशतवादाच्या परिणामानुसार 163 देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे
- जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये प्रचंड वाढ
- एक हजाराहून अधिक दहशतवादी घटनांमध्ये एक हजाराहून अधिक मृत्यू

हेही वाचा-  Eid al-Adha: बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देऊ नका; या मुस्लिम देशातील राजाचं नागरिकांना आवाहन, हे आहे कारण

पाकिस्तानचे डोळे अजूनही उघडत नाहीत 
पाकिस्तानला स्वतःच खत-पाणी घालून वाढवलेल्या दहशतवादाच्या विषवल्लीची फळे भोगण्यास भाग पडत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व झाल्यानंतरही त्याचे डोळे उघडत नाहीत आणि पाकिस्तान अजूनही भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ग्लोबल टेररिझम इंडेक्स-2025 च्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 1,081 झाली आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने ग्लोबल टेररिझम इंडेक्स प्रकाशित केला आहे. हा गेल्या 17 वर्षांचा आलेख दर्शवतो. 
 

163 देशांची क्रमवारी
या अहवालात, दहशतवादाच्या परिणामानुसार 163 देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे. या निर्देशांकात दहशतवादी घटना, दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, जखमींची संख्या आणि ओलिसांची संख्या विचारात घेतली जाते. या अहवालात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तरीही हा देश आपण स्वतःच बळी पडत आहोत, हे समजू शकत नाही, हे लज्जास्पद आहे. कारण, वर्षानुवर्षे हा देश दहशतवादाचे उद्योग चालवत आहे.

पाकिस्तान - दहशतवादाची फॅक्टरी
पाकिस्तानमध्ये सलग पाचव्या वर्षी दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, गेल्या दशकातले मागील वर्ष पाकिस्तानसाठी सर्वात घातक ठरले आहे. पाकिस्तानमध्ये दररोज दहशतवादी हल्ले होतात. दररोज लोक मारले जातात. पाकिस्तानमध्ये दररोज दहशतवादी हल्ल्यांमध्ये सैनिकांचे प्राण जातात. तरीही पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या गुप्तचर संस्था दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध वापरण्यासाठी पोसत राहतात. 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये 517 दहशतवादी हल्ले झाले होते. जे 2024 मध्ये वाढून 1099 झाले, यावरून देशाची धोकादायक परिस्थिती दिसून येते.

हेही वाचा - लंडन : खलिस्तान्यांनी जयशंकर यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत तिरंगा फाडला, भारताकडून प्रक्षोभक कारवायांचा तीव्र निषेध

दहशतवाद थांबण्याची अपेक्षा व्यर्थ

आता जाहीर झालेल्या 12 व्या जागतिक दहशतवाद निर्देशांक (GTI) नुसार, दहशतवादी हल्ले नोंदवणाऱ्या देशांची संख्या 58 वरून 66 वर पोहोचली आहे. याचा अर्थ असा की, दहशतवादी हल्ल्यांची नोंद झालेले आणखी 8 नवीन देश उदयास आले आहेत. दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रयत्नांना हा एक मोठा धक्का आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे 45 देशांची परिस्थिती बिकट झाली आहे, तर 34 देशांची परिस्थिती सुधारली आहे. 2024 मध्ये चार सर्वात घातक दहशतवादी गटांनी त्यांचे हल्ले वाढवले आहेत, ज्यामुळे दहशतवादी हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हा देश आहे पहिल्या स्थानी

या यादीत बुर्किना फासो 8.581 गुणांसह प्रथम स्थानावर आहे, त्यानंतर पाकिस्तान 8.374 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दहशतवादग्रस्त देशांमध्ये सीरिया तिसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर माली, त्यानंतर नायजर, त्यानंतर नायजेरिया, सातव्या क्रमांकावर सोमालिया, आठव्या क्रमांकावर इस्रायल, नवव्या क्रमांकावर अफगाणिस्तान आणि दहाव्या क्रमांकावर कॅमेरून आहे.


सम्बन्धित सामग्री