Sunday, August 31, 2025 11:35:18 AM

Asia Cup India Vs Pakistan : अखेर ठरलं ! भारत विरुध्द पाकिस्तान सामना खेळण्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय

अशातच काही दिवसांपूर्वी एशिया कप संघाची घोषणा झाली.  त्यानंतर आता यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता.

asia cup india vs pakistan  अखेर ठरलं  भारत विरुध्द पाकिस्तान सामना खेळण्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय
india vs pakistan

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध मोठ्या प्रमाणात बिघडल्याचे सर्वांना माहित आहेच. मात्र याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावर किती होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी एशिया कप संघाची घोषणा झाली.  त्यानंतर आता यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. 

यावरच आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असं म्हटलं आहे.  आशिया चषक T20 स्पर्धेला येत्या 9 सप्टेंबर दुबईत सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 10 तारखेला यूएईविरुद्ध तर दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळवला जाणार आहे.  

हेही वाचा - India Asia Cup 2025 Team : एशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार तर... 

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. पहिला सामना 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. लीग स्टेजनंतर सुपर 4 राऊंड होईल. जर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहोचले तर 21 सप्टेंबरला पुन्हा भारत-पाक सामना होऊ शकतो. त्यानंतर जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर  28 सप्टेंबरला तिसऱ्यांदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. 

हेही वाचा - Online Gaming Bill 2025 : ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मंजूर ; आता असणार करडी नजर, जाणून घ्या 

आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबरपासून सुरू होईल.भारतीय संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना10 सप्टेंबर रोजी खेळेल.मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री