नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र, आता ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळं उघडं पडलं आहे. ट्रम्प यांच्यातर्फे असा दावा करण्यात आला होता की, भारतात मतदानाची संख्या वाढवण्यासाठी अमेरिकेने 21 मिलियन डॉलर रुपयांची मदत केली होती. मात्र, भारत सरकारला याची माहिती मिळताच त्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासानेही डोनाल्ड ट्रम्प यांचा दाव्याचे खंडन केले आहे.अमेरिकन दूतावासाने लेखी स्वरूपात अशी माहिती दिली की, '2014 मध्ये भारतासाठी अमेरिकेने कोणत्याही प्रकारचे फंडिंग केले नव्हते'.
हेही वाचा: Asia Cup India Vs Pakistan : अखेर ठरलं ! भारत विरुध्द पाकिस्तान सामना खेळण्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय
'भारतात मतदान वाढवण्यासाठी...'
काही दिवसांपूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपेंटने (USAID) भारतातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी जवळपास 175 कोटी रुपयांची फंडिग केली होती. यावर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक लेखी उत्तर दिले होते, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर, आता भारतातील अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे की, 'भारतात मतदान वाढवण्यासाठी असा कोणताही निधी दिलेला नाही. तसेच, गेल्या दशकात भारतात अमेरिकेने अशी कोणतीही मोहीम राबवलेली नाही'.