Sunday, August 31, 2025 09:30:28 AM

Israel Attack On Yemen : भयंकर ! घरे हादरली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या...; इस्रायलचा येमेनच्या राजधानीवर हवाई हल्ला

इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.

israel attack on yemen  भयंकर  घरे हादरली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या इस्रायलचा येमेनच्या राजधानीवर हवाई हल्ला

इस्रायलने येमेनची राजधानी साना येथील ऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. इस्रायली सैन्याने एका वीज प्रकल्प आणि एका पेट्रोल पंपाला लक्ष्य केले. हा भाग हुथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.

आयडीएफने म्हटले आहे की येमेनने नुकत्याच इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला हा प्रत्युत्तर आहे. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, ज्या लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला त्यात एक लष्करी रचना देखील समाविष्ट आहे, जिथे राष्ट्रपती भवन आहे. आयडीएफच्या मते, या सर्व ठिकाणांचा वापर हुथी बंडखोरांनी त्यांच्या लष्करी कारवायांसाठी केला होता.

हेही वाचा - Devendra Fadanvis on Lakhpati Didi Scheme : 'पुढील पाच वर्षांसाठी बंद...', लखपती दीदी योजनेबद्दल काय बोलून गेले मुख्यमंत्री फडणवीस 

येमेनच्या राजधानीतील राष्ट्रपती राजवाड्याजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे जवळील घरे हादरली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. अहवालानुसार, इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी येमेनमधून इस्रायलकडे डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे एका नवीन धोक्याचे लक्षण आहे. त्यांनी सांगितले की, हुथींनी इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.

हेही वाचा - War 2 Collection : ‘वॉर 2’ ची जबरदस्त कमाई, 'महावतार नरसिंह'चा विक्रम मोडणार? 


सम्बन्धित सामग्री