8 मार्च हा दिवस महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि त्यांच्या अपार मेहनतीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या निमित्ताने भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक पातळीवर गाजवलेली कामगिरी पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यांनी आपल्या संघर्षाने आणि जिद्दीने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कारणे दिली आहेत.या निमित्ताने भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक पातळीवर गाजवलेली कामगिरी पाहणे महत्वाचे ठरते. त्यांनी आपल्या संघर्षाने आणि जिद्दीने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी करणे दिली आहेत. या निमित्ताने भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक पातळीवर गाजवलेली कामगिरी
पी.टी. उषा – ‘उडनपरी’ची प्रेरणादायी कहाणी

क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर जसा अविभाज्य आहे, तसाच भारतीय क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषाचा अमिट ठसा आहे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी राष्ट्रीय शर्यतीत पदक जिंकणाऱ्या उषाने 1984 च्या ऑलिम्पिकमध्ये धावणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहास रचला. ऑलिम्पिक पदक हुकले, पण तिच्या प्रयत्नांमुळे देशातील असंख्य तरुणींना क्रीडाक्षेत्रात पदार्पण करण्याची प्रेरणा मिळाली.
कर्णम मल्लेश्वरी – ऑलिम्पिक पदक विजेती पहिली भारतीय महिला

कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. 2000 साली वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक पटकावत तिने भारताच्या नारीशक्तीची ताकद जगाला दाखवून दिली. तिच्या यशामुळे भारतीय महिलांसाठी क्रीडाक्षेत्रातील नवीन दारं उघडली.
मिताली राज – महिला क्रिकेटची ‘लेडी सचिन’

क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ नाही, हे सिद्ध करणाऱ्या मिताली राजने आपल्या उत्कृष्ट खेळाने महिला क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेले. ‘लेडी सचिन’ म्हणून ओळखली जाणारी मिताली भारतीय महिला क्रिकेट संघाला जागतिक स्तरावर नावारूपाला आणणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू – बॅडमिंटनमधील सुवर्णाक्षरी नावे

बॅडमिंटनमध्ये मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियाचा दबदबा असताना सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला नवा आयाम दिला. सायनाने सुरुवात केली आणि सिंधूने ती परंपरा पुढे नेत ऑलिम्पिक पदक मिळवत भारताचा झेंडा जागतिक पटलावर फडकावला.
मनु भाकर – नव्या पिढीची शौर्यगाथा

नेमबाजीत भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. एकाच हंगामात दोन पदके पटकावत तिने आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. तिच्या अपूर्व यशासाठी भारत सरकारने तिला ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
नारीशक्तीला सलाम!
आज भारतीय महिला क्रीडाक्षेत्रात मोठी मजल मारत आहेत. त्यांच्या कष्टाने आणि जिद्दीने संपूर्ण जग भारतीय महिलांच्या क्षमतेची दखल घेत आहे. या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी संकल्प करूया की महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला नेहमीच सन्मान देऊ!