Thursday, September 04, 2025 06:07:05 PM

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या

कल्याण : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ताब्यात असूनही आरोपीची मग्रुरी दिसून येत आहे. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची बापगांव परिसरात हत्या करण्यात आली होती. कुविख्यात विशाल गवळी जो बलात्कारी आहे. या आधीही त्याच्यावर अनेक केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसात जी घटना घडली त्यामुळे कल्याण पूर्वेचे वातावरण तापले होते. आज सकालपासूनच सामान्य नागरिक एकत्र येऊन त्यांनी ड प्रभागावर मोर्चा काढला होता. या घटनेनंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. त्या प्रकरणी आता चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे अशी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. नागरिकांनी आंदोलन केले आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले.

हेही वाचा : ...मजा घेण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

नेमकं काय केलं?

विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिला. अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार होता. पण आता विशाल गवळीला अटक झाली आहे. मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. विशाल गवळी अत्यंत खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सोसारख्या गुन्ह्यांमध्ये गवळी तडीपार होता. कल्याणमध्ये कोळसेवाडीतील रहिवाशांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.  


सम्बन्धित सामग्री