Monday, September 01, 2025 12:57:34 AM

Malegaon Blast Final Verdict : 'या' कारणांमुळे मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही'.

malegaon blast final verdict  या कारणांमुळे मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या निकालामुळे हिंदुत्त्ववाद्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट ससोर आली आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही. यासह, पुरोहित यांनी स्फोटके एकत्र केली याचाही पुरावा नाही. तसेच, वाहन कोणी पार्क केले? दगडफेक कोणी केले? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी केले? घटनेनंतर पोलिसांची बंदूक कोणी हिसकावली? याबद्दल कोणताही पुरावा नाही'.

हेही वाचा: Malegaon Blast Final Verdict: साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता

प्रकाश शाळसिंगकर काय म्हणाले?

आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर म्हणाले की, 'घटनास्थळी पंचनामा त्रुटींवर आधारित होता. तसेच, घटनास्थळांना बॅरिकेड दिले नव्हते. इतकच नाही, तर बॉम्ब स्फोट झाल्याने घटनास्थळ दूषित झाले होते. यासह, घटनास्थळावरून न्यायालयीन तपासणीसाठी घेतलेले पुरावे दूषित होते. कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडे वाहनाची मालकी असल्याचा कोणताही पुरावा नाही. वाहनाचा चेसिस नंबर पुसून टाकला होता आणि पुन्हा सावरण्यात आलेला नाही. स्फोटाच्या दोन वर्षांपूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह संन्यासी झाल्या होत्या. कट रचल्याचा आरोप सिद्ध करू शकलो नाही'.

'महत्वाचे साक्षीदार सोबत राहिले नाही आणि कोणताही कट सिद्ध झालेला नाही. आरोपींचे मोबाईल अनधिकृतपणे टॅप केले गेले. तसेच, योग्य विचार न करता मंजुरी दिल्यामुळे युएपीए (UAPA) लागू होऊ शकत नाही. अभिनव भारत संस्थेचे निधी दहशतवादी कार्यांसाठी वापरले याचा कोणताही पुरावा नाही. तसेच, सरकारी वकिलांनी आपला दावा सिद्ध करण्यात अपयश पत्करले. मजबूत कथा उभी करण्यात आली होती, मात्र त्याला आधारभूत पुरावे नव्हते. केवळ शंकेच्या आधारावर कारवाई करण्यात आली. सरकारी वकिलांना संशयापलीकडे गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रावर आरोपींनी घेतलेला आक्षेप कोर्टाने फेटाळला. स्फोट दुचाकीच्या बाहेर झाला असावा, असा निष्कर्ष कोर्टाने काढला. अप्रमाणित डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळाली होती', असा दावा आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी केला. 


सम्बन्धित सामग्री