Sunday, August 31, 2025 11:35:45 AM

Crime News : व्हॉट्सअॅप कॉलवर CBI आणि RBI डायरेक्टर असल्याचे सांगून महिलेची 95 लाखांची फसवणूक

देशभरात सध्या सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशाच एका महिलेला अज्ञातांनी व्हॉटस अॅप कॉल करून CBI आणि RBI डायरेक्टर असल्याचे सांगत 95 लाखांचा गंडा घातला.

crime news  व्हॉट्सअॅप कॉलवर cbi आणि rbi डायरेक्टर असल्याचे सांगून महिलेची 95 लाखांची फसवणूक

Crime News : देशभरात गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असाच एक फसवणुकीचा प्रकार उजेडात आला आहे. या महिलेला अज्ञात क्रमांकावरून व्हॉटस अॅप कॉल आला होता. या कॉलवर दोन अज्ञातांनी CBI आणि RBI डायरेक्टर असल्याचे सांगत तिला तिचा पती आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडल्याचे सांगितले. विविध व्यवहार करायला लावून त्यांनी या महिलेला तब्बल 95 लाखांचा चुना लावला आहे.

महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 15 जानेवारी 2025 रोजी तिला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला आणि कॉल करणाऱ्याने दावा केला की, तिच्या पतीचे आधार कार्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आले आहे.ही खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या बँक खात्यांची माहिती मिळवली आणि त्याच्या मदतीने अनेक अनाधिकृत व्यवहार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेने पोलिसांना सांगितलं की, “आरोपींनी तिचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःची ओळख सीबीआय संचालक आणि आरबीआय संचालक म्हणून करून दिली.”

हेही वाचा - ‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस

चंदीगड शहरातील एका महिलेची तिच्या पतीला एका प्रकरणात सीबीआयने पकडल्याचा दावा करून 95 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंदीगड पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, 'फोनवरून दिलेल्या सूचनांचे पालन करत महिलेने तिच्या खात्यामधून मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित केली. मात्र, नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने अधिकृत तक्रार दाखल केली'.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या प्रकरणात चौकशी सुरू असून आरोपींचे बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल क्रमांक यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. महिलेच्या तक्रारीवरून सायबर क्राइम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - फाशीचे रुपांतर जन्मठेपेत! आता पॅरोललाही पात्र? बालहत्याकांडातील सीमा गावितबाबत सरकारने भूमिका मांडावी - उच्च न्यायालय

यादरम्यान, एका निवृत्त लष्करातील अधिकाऱ्याला देखील 10 लाखांना गंडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चंदीगड येथील रहिवासी कर्नल मनजीत सिंग (निवृत्त) यांनी आरोप केला आहे की, चंदीगड येथील सेक्टर 46/सी येथील आरोपी नीरज भानोत यांने भरगोस परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक सायबर माध्यमातून त्यांची 10 लाख रुपयांची फसवणूक केली. प्राथमिक चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री