Monday, September 01, 2025 02:06:17 PM

तरुणीला पडलेल्या प्रश्नाने केला घात..

तरुणांमध्ये नेहमीच खूप प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे ती स्वतःच शोधत असतात असं म्हणतात. त्यातच आता 17 वर्षीय तरुणीला पडलेल्या प्रश्नाने तीच जीवन संपलंय. ही घटना आहे नागपूरमधील.

तरुणीला पडलेल्या प्रश्नाने केला घात

नागपूर: तरुणांमध्ये नेहमीच खूप प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे ती स्वतःच शोधत असतात असं म्हणतात. त्यातच आता 17 वर्षीय तरुणीला पडलेल्या प्रश्नाने तीच जीवन संपलंय. ही घटना आहे नागपूरमधील. नागपूरमधील ही धक्कादायक घटना ऐकून सर्वचजण थक्क झालेत. नागपूरमध्ये एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केलीय. मृत्यूनंतर माणसाचं होतं काय? असा प्रश्न या तरुणीला पडला आणि तिने इंटरनेटवर सर्च करून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इयत्ता बारावीमध्ये ही तरुणी शिकत असून ती आई वडिलांसोबत नागपूर येथे राहायची. आई वडिलांची एकुलती एक असल्याने तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? असं या तरुणीने इंटरनेटवर सर्च केले असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या तरुणीने हाताच्या मनगटावर वार केले. त्यानंतर तिने दगडाच्या ब्लेडच्या चाकूनेही स्वत:ला जखमी केले. त्यानंतर स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलेला मृतदेह पाहिल्यानंतर आईने एकच आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. 

'पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. या पोलीस तपासात समोर आले की, तिने गुगलवर 'मृत्यूनंतर काय होतं, हे सर्च केलं होतं. तसेच डायरीमध्ये परदेशी संस्कृतीविषयी सविस्तर लिहिलं होतं. या तरुणीला युरोपीय संस्कृतीची आवड होती. गेल्या काही वर्षांपासून ती मृत्यूविषयी माहिती जाणून घेत होती. यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोललं जातंय. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पोलीस तपास करीत आहे. 


सम्बन्धित सामग्री