Monday, September 01, 2025 10:48:59 AM

शिवनेरी बसमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा चालक मद्यपान करून बस चालवत असल्याचा भयानक प्रकार उघडकीस झाला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे ही गंभीर घटना वेळीच लक्षात आली.

शिवनेरी बसमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुणे: मद्यपान करून गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. आतापर्यंत याच कारणामुळे अनेक अपघात घडले आहेत. त्यासोबतच, यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, असं असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा चालक मद्यपान करून बस चालवत असल्याचा भयानक प्रकार उघडकीस झाला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे ही गंभीर घटना वेळीच लक्षात आली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

हेही वाचा: महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण; आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

स्प्राईटच्या बाटलीत दारू

ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता घडली. स्वारगेटहून ठाण्याला जाणारी शिवनेरी बस चालवत असताना, चालक वारंवार स्प्राईटच्या बाटलीतून काहीतरी पित होता. सुरुवातीला प्रवाशांना वाटले की तो फक्त कोल्ड्रिंक पित आहे. मात्र, काही वेळाने त्याचे वर्तन बदलू लागले. चालकाचा वास आणि हालचाली पाहून काही प्रवाशांना त्याच्यावर संशय आला. जेव्हा शिवनेरी बस बस नळ स्टॉप परिसरात पोहोचली, तेव्हा प्रवाशांनी चालकावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरू केले. अखेर, जेव्हा एका प्रवाशाने स्प्राईटच्या बाटलीचा वास घेतला, तेव्हा त्याच्या त्याच्या निदर्शनात आले चालक मद्यपान करून गाडी चालवत आहे. चालकाला रंगेहात पडकून प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येताच मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या शिवनेरी बसमधून महिला, मुले आणि वयोवृद्ध प्रवासी स्वारगेट ते ठाणे प्रवास करत होते. 


सम्बन्धित सामग्री