Sunday, September 14, 2025 08:52:15 PM

Dashavatar Movie Box Office Collection: 'कोकणचा कांतारा' हिट की फ्लॉप? दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

हा आठवडा मराठी चित्रपटसृष्टीसाठी चढाओढीचा काळ होता. एकाच दिवशी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले – 'दशावतार', 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट'.

dashavatar movie box office collection  कोकणचा कांतारा हिट की फ्लॉप दिलीप प्रभावळकरांच्या दशावतारची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई

Dashavatar Movie Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) सध्या चर्चा आहे ती एकाच चित्रपटाची - 'दशावतार'! ‘कोकणातला कांतारा’ अशी ओळख मिळवलेला हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकलेल्या दमदार टीझरने तर या चित्रपटाची हवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच तयार केली. आता पहिल्याच दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने हे सिद्ध केले आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा (Dashavatar Movie) जलवा!
हा आठवडा मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा कसोटीचा काळ होता. एकाच दिवशी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले – 'दशावतार', 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट'. या तिन्ही चित्रपटांचं जोरदार प्रमोशन केलं होतं. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती की कोणता चित्रपट बाजी मारणार. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'दशावतार'ने या शर्यतीत बाजी मारली आहे.

हेही वाचा - Disha Patani House Firing Case: 'आम्ही सनातनी आहोत...' दिशा पटानीच्या घरावरील गोळीबारावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया

'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, 'दशावतार'ने पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल 65 लाख रुपयांची कमाई केली आहे, तर भारतात 58 लाखांचा गल्ला जमवला आहे.
हा आकडा पाहता, कोकणाच्या पारंपरिक कथांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकल्याचे स्पष्ट होते. पहिल्या दिवसाची कमाई ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या चित्रपटाला लोकांची किती पसंती मिळते आणि दशावतार चित्रपट किती विक्रम मोडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

'दशावतार'मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी
झी स्टुडिओज आणि ओशन फिल्म कंपनीच्या निर्मिती असलेला हा चित्रपट त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जात आहे. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 

गुरु ठाकूर यांचे संवाद आणि गीते, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आणि दमदार निर्मितीमुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव देत आहे. 'दशावतार' हा चित्रपट महाराष्ट्राची संस्कृती, निसर्ग आणि लोककला यांची एक नवी ओळख जगभरातील प्रेक्षकांना करून देणार आहे.

हेही वाचा - Dashavtar Movie Review : मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' सिनेमा ठरणार गेमचेंजर? जाणून घ्या चित्रपटाचा रिव्ह्यू


सम्बन्धित सामग्री