मुंबई : दशावतार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरुपी भूमिकांची झलक या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आवाजात चित्रपटातील टीझरमध्ये गाऱ्हाण मांडण्यात आलं असून कलाकारांची झलक देखील पाहायला मिळत आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट असून येत्या 12 सप्टेंबरपासून हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
हेही वाचा: आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित
दशावतारमध्ये दिलीप प्रभावळकर हे बहुरुपी भूमिकांमध्ये दिसत असून सोबत भरत जाधव, महेश मांजरेकर, विजय केंकरे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदरकर, सुनील तावडे, अभिनय बेर्डे आदी मातब्बर कलाकार मंडळी आहेत. त्यामुळे दशावतारचा खेळ चांगलाच रंगणार यात शंका नाही. झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे.