Wednesday, August 20, 2025 10:38:52 AM

जॉन अब्राहमच्या 'The Diplomat' ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' दिवशी येणार सिनेमागृहात

जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅट चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी ही तारीख ७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली होती.

जॉन अब्राहमच्या the diplomat ची नवी रिलीज डेट जाहीर आता या दिवशी येणार सिनेमागृहात
जॉन अब्राहमच्या 'The Diplomat' ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' दिवशी येणार सिनेमागृहात

जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द डिप्लोमॅट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी ही तारीख ७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली होती. परंतु आता निर्मात्यांनी होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

काय आहे 'द डिप्लोमॅट'ची कथा 
'द डिप्लोमॅट' ही एका रोमांचक मिशनची कथा आहे. यामध्ये एक पाकिस्तानी मुलगी भारतीय दूतावासात आश्रय घेण्यासाठी पोहोचते आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांची मालिका चित्रपटात पाहायला मिळेल. जॉन अब्राहम या चित्रपटात राजनयिक जेपी सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे, जो या मिशनसाठी जबाबदार असतो. हा चित्रपट केवळ एका रहस्यमय मिशनची कहाणी सांगत नाही, तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि धोरणांचा सखोल विचार देखील मांडला गेला आहे.

'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा ट्रेलर १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी ७ मार्च ही प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली होती. पण टी-सीरीजने इंस्टाग्रामवर नवीन पोस्टर शेअर करत ही तारीख बदलल्याची घोषणा केली आहे. "प्रतीक्षा थोडी वाढली असली, तरी त्याचा परिणाम मोठा असणार आहे" असे कॅप्शन देत निर्मात्यांनी नविन डेटची बातमी दिली. चित्रपट होळीच्या सुट्टीत प्रदर्शित करण्याचा निर्णय हा एक व्यावसायिक दृष्टिकोन असून मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा - 'देशप्रेम तुला काय माहिती? तू नीच आहेस आणि असाच मरशील,' कोहलीवरील ट्विटवर युजर्सची फालतू कमेंट; जावेद अख्तर संतापले

'द डिप्लोमॅट'ची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, तसेच विपुल डी. शाह, जतीश वर्मा, जॉन अब्राहम, समीर दीक्षित, अश्विन वर्दे, राजेश बहल आणि राकेश डांग यांनी केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत शरीब हाश्मी, रेवती, कुमुद मिश्रा आणि सादिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे कथानक आणि संवाद रितेश शाह यांनी लिहिले असून, दिमो पोपोव्ह आणि एमएससी ग्याड यांनी छायाचित्रण केले आहे. एडिटिंगची जबाबदारी कुणाल वाळवे यांनी सांभाळली असून, संगीतकार म्हणून ए.आर. रहमान यांनी योगदान दिले आहे. चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहेत.

हेही वाचा - लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट? मराठी अभिनेत्री ठरली सोशल मीडियावरील चर्चेला कारण

दरम्यान, चित्रपटाचे कथानक, रोमांचक मिशन आणि जॉन अब्राहमचा दमदार अभिनय पाहता प्रेक्षकांमध्ये 'द डिप्लोमॅट'बद्दल मोठी उत्सुकता आहे. होळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल.  
 


सम्बन्धित सामग्री