Monday, September 01, 2025 01:05:46 PM

“Mrs. Katrina Kaif!” ऑस्ट्रियातील परफेक्ट व्हेकेशनचे फोटो पाहून चाहते फिदा

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कॅटरीना कैफ नेहमीच आपल्या स्टायलिश लूक आणि खासगी आयुष्याबाबत चर्चेत असते. सध्या ती ऑस्ट्रियातील एका हेल्थ रिसॉर्टमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

“mrs katrina kaif” ऑस्ट्रियातील परफेक्ट व्हेकेशनचे फोटो पाहून चाहते फिदा


बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कॅटरीना कैफ नेहमीच आपल्या स्टायलिश लूक आणि खासगी आयुष्याबाबत चर्चेत असते. सध्या ती ऑस्ट्रियातील एका हेल्थ रिसॉर्टमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे, आणि तिच्या या ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे एका खास गोष्टीने – तिच्या टेबल कार्डवर लिहिलेल्या “Mrs. Katrina Kaif” या उल्लेखाने!


कॅटरीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ऑस्ट्रियातील मॅयरलाइफ अल्टॉसे रिसॉर्टमधून काही सुंदर फोटो शेअर केले. बर्फाच्छादित डोंगर, शांत वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात तिने सुट्टी एन्जॉय करत असल्याचे फोटो आणि कॅप्शनमधून दिसून येते. कॅप्शनमध्ये ती म्हणते,
“या ठिकाणचे शांत आणि निसर्गरम्य वातावरण मला नेहमीच मंत्रमुग्ध करते… बर्फाच्छादित पर्वतांमधून चालताना तलावातील वितळणाऱ्या हिमाचा नाद ऐकायला मिळतो. येथे वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि मला सदैव आत्मचिंतन करण्याची संधी मिळते.”

हेही वाचा :शुभ मंगल सावधान! अशी गजब लग्नपत्रिका वाचली आहे का?

“Mrs. Katrina Kaif” पाहून चाहते भावूक!

या पोस्टमधील एका फोटोमध्ये रिसॉर्टच्या लॉबीत ठेवलेले टेबल कार्ड दिसते, ज्यावर स्पष्टपणे “Mrs. Katrina Kaif” असे लिहिले आहे. हा उल्लेख पाहून चाहत्यांनी त्वरित यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
    •    एका चाहत्याने लिहिले, “मी त्या टेबल कार्डवर ‘Mrs. Katrina Kaif’ पाहिलं 
    •    दुसऱ्या एका फॅनने कमेंट केली, “हे ‘Mrs’ पाहून मन भरून आलं”
    •    एका युजरने लिहिले, “कॅट, तू प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसतेस! तू एक परिपूर्ण भारतीय सून आहेस, जी प्रत्येक प्रसंगात शोभून दिसते!”

हेही वाचा :पद्मश्री उशिरा मिळाल्याने खंत? अशोक सराफांचे उत्तर आश्चर्यचकित करणारे!


लग्नानंतर कॅटरीना आणि विकी कौशलचे अनेक फॅन्स त्यांच्या जोडीवर प्रेम करताना दिसतात. तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कतरिनाने तिच्या फिटनेस आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि आता “Mrs. Katrina Kaif” या उल्लेखाने  ती पुन्हा चर्चेत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

 

'>http://


सम्बन्धित सामग्री







Live TV