Sunday, August 31, 2025 11:12:38 AM

गरोदर असल्याच्या चर्चांवर सोनाक्षीने सोडले मौन

सोनाक्षी सिन्हाने सोडले मौन . मला हे सांगायचं आहे की......

गरोदर असल्याच्या चर्चांवर सोनाक्षीने सोडले मौन

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल दोघे या वर्षी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर सोनाक्षी आणि झहीर अनेक देशांमध्ये फिरताना दिसले. त्यावेळीही त्यांनी अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे दिसले. अनेकदा सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. समाज माध्यमांमध्ये यासंबंधीच्या पोस्टदेखील व्हायरल होताना दिसल्या. पण आता या सगळ्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हा हिने मौन सोडले आहे.

सोनाक्षीने कर्ली टेल्सला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सोनाक्षीने गरोदर असल्याच्या चर्चांवर मौन सोडले आहे. सोनाक्षी म्हणाली की मला हे सांगायचं आहे की मी गरोदर नाही. मी फक्त जाड झाले आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने सोनाक्षीला गरोदर असल्या कारणाने शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

लग्नानंतर फिरण्यात आणि लंच-डिनरमध्येच आम्ही व्यस्त आहोत. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही असेही सोनाक्षीने सांगितले.

 

सोनाक्षी झहीरसोबत आयुष्यातील क्व़लिटी टाईम घालवत असल्याचे पाहायला मिळते. दोघेही एकमेकांबरोबर आनंदाने जगत आहेत. ते दोघे नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये शेअर करतात. नुकताच झहीरचा वाढदिवस सोनाक्षी व तिच्या कुटुंबाबरोबर पार पडला. यावेळी शत्रुघ्न सिन्हा. पुनम सिन्हा, रेखा हे सहभागी झाले होते. या सेलिब्रेशनवेळी सगळे खुश असल्याचे दिसून आले.


सम्बन्धित सामग्री