बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाची विशेष दखल घेतली जात आहे. ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
शिवजयंतीच्या निमित्ताने विकी कौशलने आपल्या चाहत्यांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, तो 19 फेब्रुवारीला रायगडावर जाणार आहे.

हेही वाचा: शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींची मराठीत खास पोस्ट, छत्रपती शिवरायांना भावपूर्ण अभिवादन
व्हिडिओमध्ये विकी म्हणतो,
“नमस्कार! 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी रायगडावर जाणार आहे. आपल्या देवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!”

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
‘छावा’चा अभूतपूर्व प्रतिसाद!
‘छावा’ चित्रपटाने केवळ 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. लोकांनी विकी कौशलच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजान निर्मित हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहे.चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकी कौशलने अनेकदा शिवरायांविषयी आपली भक्ती व्यक्त केली होती. त्याने सांगितले होते की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो रायगडावर जाणार, आणि त्याने आपला शब्द खरा करून दाखवला आहे.