Thursday, August 21, 2025 02:33:48 AM

“छावा टॅक्स फ्री का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण!”

महाराष्ट्रात “छावा” करमुक्त (Tax-Free) करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले असून, महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त का होऊ शकत नाही.

“छावा टॅक्स फ्री का नाही मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण”

देशभरात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित “छावा” या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशल यांच्या प्रभावी भूमिकेमुळे आणि ऐतिहासिक मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. देशभरात हा चित्रपट नवनवीन विक्रम रचत असताना, महाराष्ट्रात “छावा” करमुक्त (Tax-Free) करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले असून, महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त का होऊ शकत नाही, याचे स्पष्ट कारण दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि पराक्रम अफाट होते. मात्र, इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. ''छावा'' हा चितपट त्यांचे महत्व  पुन्हा अधोरेखित करतो. त्यामुळे तो करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु, महाराष्ट्रात 2017 पासून करमणूक कर (Entertainment Tax) नाही. त्यामुळे तो माफ करणे शक्य नाही. इतर राज्यांत जेव्हा एखाद्या चित्रपट टॅक्स फ्री केला जातो, तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. पण महाराष्ट्रात हा करच अस्तितवात नाही, त्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री होऊ शकत नाही.  

हेही वाचा :  शिवजयंतीच्या निमित्ताने विकी कौशल रायगडावर


मग ‘छावा’ चित्रपटासाठी सरकार काय करणार?
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “संभाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रचारासाठी आणखी काय करता येईल, यावर आम्ही विचार करत आहोत. या चित्रपटाचा व्यापक प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील.”

‘छावा’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

‘छावा’ चित्रपटाला महाराष्ट्रभर तुफान प्रतिसाद मिळत आहे. इतिहासप्रेमी आणि प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील हा चित्रपट चर्चेत असून, संभाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी नव्या पिढीमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : शिवरायांचे स्वराज्य शेतकऱ्यांसाठी सुवर्णयुग का होते ?

टॅक्स फ्री नसला तरी ‘छावा’ची गगनभरारी सुरूच!

महाराष्ट्रात करमणूक कर नसल्याने ‘छावा’ टॅक्स फ्री होणार नाही, हे स्पष्ट झाले असले तरीही, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत आहेत. करमुक्त नसला तरीही ‘छावा’ची गगनभरारी थांबणार नाही, हे मात्र नक्की!
 


सम्बन्धित सामग्री