Saturday, September 06, 2025 12:51:22 PM

Red Fort: लाल किल्ल्यातून हिऱ्यांनी जडवलेला सोन्याचा कलश चोरीला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जैन समुदायाच्या सुरू असलेल्या धार्मिक विधीतून कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान कलश चोरीला गेला आहे. व्यापारी सुधीर जैन दररोज हा कलश पूजेसाठी आणत असत.

red fort लाल किल्ल्यातून हिऱ्यांनी जडवलेला सोन्याचा कलश चोरीला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Red Fort: नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात मोठी चोरीची घटना समोर आली आहे. जैन समुदायाच्या सुरू असलेल्या धार्मिक विधीतून कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान कलश चोरीला गेला आहे. व्यापारी सुधीर जैन दररोज हा कलश पूजेसाठी आणत असत. याच कार्यक्रमाला गेल्या मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. लाल किल्ल्यातील चोरीनंतर पुन्हा एकदा दिल्लीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - Vanraj Andekar Murder Case: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड; आरोपीच्या मुलाची गोळ्या घालून हत्या; टोळीयुद्धामुळे पुण्यात घबराट

सीसीटीव्हीत आरोपी कैद

स्वागताच्या गोंधळात हा कलश स्टेजवरून गायब झाला. पोलिसांनी सांगितले की संशयिताच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. आरोपीची ओळख पटली असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. हा धार्मिक विधी 15 ऑगस्टपासून सुरू असून 9 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा -  Bomb Threat: '34 वाहनांमध्ये 400 किलो RDX...'; वाहतूक पोलिसांना धमकी, मुंबईत हाय अलर्ट जारी

चोरीला गेलेल्या कलशाची किंमत कोटींमध्ये

सुमारे 1 कोटी रुपयांचा हा कलश 760 ग्रॅम सोन्याचा बनवलेला असून त्यावर 150 ग्रॅम हिरे, माणिक व पन्ना जडवलेले होते. व्यापारी सुधीर कुमार जैन यांनी सांगितले की, हा कलश अतिशय मौल्यवान आहे आणि चोर धार्मिक पोशाखात आला होता. 
 


सम्बन्धित सामग्री