Sunday, August 31, 2025 05:46:32 PM

'भानगड' किल्ल्याची नेमकी भानगड काय? वातावरणात बदल, विचित्र आवाज; संध्याकाळ होताच किल्ला पर्यटकांसाठी बंद

भारतात असे अनेक रहस्यमयी आणि गूढ ठिकाणे आहेत, जिथे गेल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा असेल, तर भानगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या.

भानगड किल्ल्याची नेमकी भानगड काय वातावरणात बदल विचित्र आवाज संध्याकाळ होताच किल्ला पर्यटकांसाठी बंद

राजस्थान: भारतात असे अनेक रहस्यमयी आणि गूढ ठिकाणे आहेत, जिथे गेल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा असेल, तर भानगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या. या ठिकाणी होणाऱ्या रहस्यमयी हालचालींमुळे सूर्यास्तानंतर या ठिकाणी प्रवेश करण्यास भारत सरकारने बंदी घातली आहे. तसेच, येथे होणाऱ्या विचित्र हालचाली आणि आवाजांमुळे हे ठिकाण कुप्रसिद्ध आहे. माहितीनुसार, भारतातील भानगड किल्ला हा आशियातील सर्वात झपाटलेला किल्ला मानला जातो. या किल्ल्याची उभारणी 17 व्या शतकात राजा माधोसिंग यांनी केली होती. मात्र, येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गेल्या अनेक दशकांपूर्वी एका तांत्रिकाने दिलेल्या शापामुळे हे ठिकाण शापित झाले. 

हेही वाचा: फक्त तिकीटचं नाही, तर 'या' मार्गातून चित्रपटगृह कमावतात लाखो रुपये

'या' कारणामुळे भानगड किल्ला झाला कुप्रसिद्ध

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या किल्ल्याचा इतिहास राजा माधोसिंग आणि त्यांचे वडील राजा मान सिंग यांच्याशी जोडलेला आहे. काही दशकांपूर्वी एक तांत्रिक या गावात आला होता. तेव्हा, त्या तांत्रिकाने राणी रत्नावतीला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. तो तांत्रिक त्याच्या जादूने राणीला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गी गोष्ट राणीच्या लक्षात आली, तेव्हा राणीने त्या जादूचा प्रतिकार केला. ज्यामुळे, तांत्रिकाचा जागीच मृत्यू झाला. मारताना, या तंत्रिकाने असा शाप दिला की, 'भानगड किल्ल्याचा नाश होईल'. 

काहींच्या मते, या किल्ल्यातून विचित्र आवाज ऐकू येतात, तर काहींना चित्र विचित्र आकृत्या दिसतात. तर, याठिकाणी अनेकांना कुणाची तरी उपस्थिती जाणवते. यामुळे, सायंकाळी भानगडचा किल्ल्यावर प्रवेश करण्यास मनाई आहे. 

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री