Sunday, August 31, 2025 08:34:50 AM

Jammu Landslide : भयंकर ! निसर्गाचं रौद्ररूप, वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, मृतांचा आकडा 32 वर, बचावकार्य सुरु

अलिकडच्या काळात सततचा पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता, सर्व प्रवाशांना हवामान सुधारल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे पुनर्नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

jammu landslide  भयंकर  निसर्गाचं रौद्ररूप वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन मृतांचा आकडा 32 वर बचावकार्य सुरु

श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अर्धकुंवरी भागात भूस्खलनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी प्रवासी अडकले आहेत आणि बचाव कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. श्री माता देवा तीर्थ मंडळाने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात सततचा पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता, सर्व प्रवाशांना हवामान सुधारल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे पुनर्नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रियासीचे एसएसपी परमवीर सिंह यांनी दिली. याशिवाय, जम्मूमधील चेनानी नाल्यात कार कोसळल्याने तीन यात्रेकरू वाहून गेले. बेपत्ता झालेल्या तीन यात्रेकरूंपैकी दोन राजस्थानमधील धोलपूरचे आणि एक आग्रा येथील आहे.

हेही वाचा - Pune Metro: पुणेकरांसाठी गणेशोत्सवात खास सेवा; दर 3 मिनिटांनी धावणार गाड्या, प्रवाशांना दिलासा 

जम्मूचा देशाच्या इतर भागांशी असलेला रस्ते आणि रेल्वे संपर्क पूर्णपणे तुटला होता. मंगळवारी रात्री मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने रात्री 9 नंतर लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घातली होती.

हेही वाचा - YouTube AI: व्हिडिओ अपलोड्समध्ये गुप्तपणे AI बदल? YouTube ने केला खुलासा 

जम्मू ते रामबन या सुमारे 12 ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. चक्की पुल पठाणकोट येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जम्मू, उधमपूर, कटरा येथे येणाऱ्या 18 गाड्या रद्द करण्यात आल्या. जम्मू ते श्रीनगरला जाणाऱ्या दोन विमान उड्डाणेही रद्द करावी लागली.


सम्बन्धित सामग्री