Thursday, August 21, 2025 12:37:52 AM

Jharkhand Crime :18 अल्पवयीन मुलांकडून 5 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार; ग्रामस्थ संतप्त

पाचही पीडित मुली एका लग्न समारंभात गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत असताना 18 अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं अन् त्यांच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेबाबतची वाच्यता कुठेच न करण्याची धमकी मुलींना दिली.

jharkhand crime 18 अल्पवयीन मुलांकडून 5 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार ग्रामस्थ संतप्त

Jharkhand Khunti Physical Abuse: लग्नातून परतणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींचे 18 अल्पवयीन मुलांनी अपहरण केले आणि नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या मुली एका लग्न समारंभातून घरी परतत होत्या. या प्रकरणातील सर्व 18 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून 16 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या मुली येथील स्थानिक आदिवासी समाजातील आहेत.

पाचही पीडित मुली एका लग्न समारंभात गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत असताना 18 अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं अन् त्यांच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेबाबतची वाच्यता कुठेच न करण्याची धमकी या मुलींना देण्यात आली. या मुलांच्या तावडीतून सुटून पीडित मुली घरी पोहोचल्या आणि त्यांच्यासोबत घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी त्यांच्या गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. पाचपैकी तिघींच्या जबाबाच्या आधारावर गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच, या मुलांना अटकही करण्यात आली.

हेही वाचा - 6 जणांवर जीवघेणा हल्ला! 23 वर्षांचा तरुण स्वतःच्याच घरच्यांच्या जीवावर का उठला? विष प्यायल्याचं सांगत पोलिसांसमोर हजर

ही लज्जास्पद घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील उलिहाटून निचितपूर येथे घडली आहे. येथे किशोरवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 18 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, 12 ते 17 वयोगटातील आरोपींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे आणि पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

अल्पवयीन मुलांवर चालवणार प्रौढ खटला
'18 मुलांना अटक करण्यात आली आहे. सर्व मुले अल्पवयीन आहेत तर सर्व बलात्कार पीडित मुली आहेत. या प्रकरणात त्यांना सर्व सरकारी सुविधा पुरवल्या जात आहेत', असे वृत्तसंस्थेने झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता यांच्या हवाल्याने म्हटले आहे. डीजीपी म्हणाले की, '16 वर्षांवरील मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाईल जेणेकरून, आपल्या समाजात मुले अशी घृणास्पद कृत्ये करणार नाहीत.'

मुली लग्नाहून परतत होत्या
खुंटीचे पोलिस अधीक्षक (एसपी) अमन कुमार म्हणाले की, शुक्रवारी रात्री उशिरा रानिया परिसरात लग्न समारंभाला उपस्थित राहून पाच मुली घरी परतत असताना ही घटना घडली. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या किशोरवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील लोक संतप्त झाले आहेत आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

हेही वाचा - हनीमूनला गेलेल्या नवविवाहितेला पतीकडून मारहाण; जीव वाचवून गोव्याहून एकटीच परतली, गुन्हा दाखल


सम्बन्धित सामग्री