Sunday, August 31, 2025 08:05:08 PM

दिल्ली स्थानकातील चेंगराचेंगरीवर नेतेमंडळींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दिल्ली स्थानकातील चेंगराचेंगरीवर नेतेमंडळींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. महाकुंभला जाणाऱ्या 2 गाड्या उशिरा आल्याने गर्दी वाढली. त्यामुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. नवी दिल्लीत घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त होत आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यांसंदर्भात पोस्ट केली आहे. 

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीवर मोदींची एक्स पोस्ट

रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना करतो. 
घटनास्थळी प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. 

हेही वाचा : भास्कर जाधव ठाकरे गट सोडणार का?, भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत व्यक्त
 

गृहमंत्री अमित शाह यांची पोस्ट 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. दिल्लीचे उपराज्यपाल आणि दिल्ली पोलिस आयुक्तांशीही बोललो. सर्वांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमींवर शक्य तितके उपचार केले जात आहेत. मी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची पोस्ट  

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्टेशनवरून येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहेत. रेल्वे स्थानकावरील मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. मृतांची आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर करावी आणि बेपत्ता लोकांची ओळख पटवावी. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत मनापासून संवेदना आहेत. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. 

 

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची बातमी अस्वस्थ करणारी आणि दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आमच्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे होण्याची प्रार्थना अशा आशयाची पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री