Sunday, August 31, 2025 07:48:56 PM

मोदी आणि योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला 2 वर्षांची शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात आरोपीला दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोदी आणि योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला 2 वर्षांची शिक्षा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात आरोपीला दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देणाऱ्या या व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ही धमकी दिली होती. न्यायालयाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आरोपी कोणत्याही सहानुभूतीस पात्र नाही, असे स्पष्ट केले आहे. 

29 मार्च 2023 रोजी न्यायिक दंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला. आरोपी कामरान खान मानसिक अस्थिर असल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, आरोपीने त्याच्या मानसिक स्थितीबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे आरोपीला दोन वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा: 'मुस्लिमांचे अधिकार हिरावले जातायेत'; वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

या प्रकरणात फिर्यादी पक्षाने मांडलेल्या माहितीनुसार, आरोपीने नोव्हेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून जेजे रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. याशिवाय, मोदींच्या हत्येसाठी दाऊद इब्राहिम 5 कोटी रुपये देऊ करत असल्याचे आणि योगींना बॉम्बने उडवण्यासाठी एका सहकाऱ्याला 1 कोटी रुपये देण्यात आल्याचे त्याने सांगितले होते. पोलिस तपासात आरोपी जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेल्याचे समोर आले असून, रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे होणाऱ्या विलंबामुळे त्याने नियंत्रण कक्षाला फोन करून ही खोटी माहिती दिली होती.

न्यायालयाने या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहत असे बनावट दावे सरकारी सुरक्षेसाठी घातक ठरू शकतात, असे म्हटले. यामुळे पोलिस यंत्रणेवर अनावश्यक तणाव वाढतो आणि वास्तविक धोके ओळखणे कठीण होते. आरोपीच्या मागील गुन्हेगारी इतिहासाचा विचार करता, त्याच्यावर दया दाखवणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 


 


सम्बन्धित सामग्री