Sunday, August 31, 2025 02:18:45 PM

NBFC For Investor : आता एनबीएफसींना गुंतवणूकदारांचा आधार वाढवण्याची संधी; क्रिसिल अहवालाचा निष्कर्ष

क्रिसिल इंटेलिजेंसनं नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, भारतातील किरकोळ क्रेडिट बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) त्यांचा गुंतवणूकदार आधार वाढवण्याच्या नवीन संधी

nbfc for investor  आता एनबीएफसींना गुंतवणूकदारांचा आधार वाढवण्याची संधी क्रिसिल अहवालाचा निष्कर्ष

क्रिसिल इंटेलिजेंसनं नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, भारतातील किरकोळ क्रेडिट बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) त्यांचा गुंतवणूकदार आधार वाढवण्याच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या अहवालात भारतीय किरकोळ पत क्षेत्रात दिसून येणाऱ्या मजबूत आणि सातत्यपूर्ण वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुढील काही वर्षांत ती सतत वाढत राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : 5 वर्ष पूर्ण होण्याआधीचं तुम्ही नोकरी सोडली का? तरीही 'या' लोकांना मिळू शकते ग्रॅच्युइटीची रक्कम

त्यात म्हटले आहे की, "भारतीय किरकोळ क्रेडिट बाजारपेठेतील वाढती मागणी आणि सकारात्मक भावना, बँका तसेच एनबीएफसी दोघांनाही त्यांचा गुंतवणूकदार आधार वाढवण्याची संधी देतात." अधिकाधिक किरकोळ कर्जदार येत असल्याने, एनबीएफसींना निधी स्रोतांमध्ये विविधता आणण्याची आणि गुंतवणूकदारांच्या नवीन श्रेणी आकर्षित करण्याची संधी आहे.

अहवालानुसार, भारतीय किरकोळ क्रेडिट बाजार वेगाने वाढत आहे. तसेच आर्थिक वर्ष 2025 ते 2028 दरम्यान 14-16 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) नोंदवण्याचा अंदाज आहे.


सम्बन्धित सामग्री