Sunday, August 31, 2025 11:23:37 AM

अबब! या'' तरुणाच्या खात्यात आले तब्बल 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये; रातोरात झाला अब्जाधीश, मात्र कारण समजले आणि...

ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये जमा झाले.

अबब या तरुणाच्या खात्यात आले तब्बल 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये रातोरात झाला अब्जाधीश मात्र कारण समजले आणि

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपयांची रक्कम आल्याने त्याला धक्का बसला. या असामान्य व्यवहारामुळे दीपक काही मिनिटांतच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आला. परंतू दीपक आणि त्याचे कुटुंबिय ही 36 अंकी रक्कम काढू शकले नाहीत. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आयकर विभागाला माहिती दिली.

हेही वाचा: उद्या काहीतरी मोठं घडणार? मोदींच्या पाठोपाठ शाहाही राष्ट्रपतींच्या भेटीला

जेव्हा पोलीस आणि बँकेच्या टीमने तपास सुरू केला, तेव्हा त्यांना आढळले की ही रक्कम बँकेच्या सिस्टममध्ये नोंदवलेली नाही, तर ही रक्कम दीपकच्या मोबाईल बँकिंग अॅपमध्ये अजूनही दिसत होती. हा तांत्रिक बिघाड आहे की, एखाद्या मोठ्या सायबर फसवणुकीचा प्रकार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून दीपकचे बँक खाते तात्काळ गोठवण्यात आले आहे. तर हा संपूर्ण अहवाल प्राप्तिकर विभागाला पाठवण्यात आला आहे. यावर आयकर आणि सायबर सुरक्षा एजन्सीदेखील सक्रिय झाल्या आहेत. ही रक्कम कशी आणि कुठून हस्तांतरित केली गेली, याचा बारकाईने तपास करत आहेत.

या प्रकरणाने सोशल मीडियावरही वादळ निर्माण केले. लोकांनी दीपकला 'खऱ्या आयुष्यात अब्जाधीश' असे म्हणत सर्व प्रकारच्या कमेंट करायला सुरुवात केली. सध्या, आयकर विभाग या प्रकरणाची सक्रियपणे चौकशी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ही रक्कम कोणत्याही लहान देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप मोठी आहे.

                    

सम्बन्धित सामग्री