तामिळनाडू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 6 एप्रिल) तामिळनाडूच्या ऐतिहासिक दौऱ्यावर असून त्यांनी भारताच्या पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पूलाचा – ‘न्यू पंबन ब्रिज’ – याचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर भारताच्या प्रगतीचं आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे.
रामनवमीनिमित्त पंतप्रधानांनी दुपारी 12 वाजता या पुलाचं उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी रामेश्वरममधील प्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेतील व पूजा करतील. याच दौऱ्यात 8,300 कोटींहून अधिक किंमतीच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली.
नवीन पंबन रेल्वे पूल हा जुन्या पुलाची जागा घेणारा अत्याधुनिक पूल आहे. सुमारे 550 कोटी रुपयांच्या खर्चाने हा पूल उभारण्यात आला आहे. याची लांबी 2.08 किलोमीटर असून यामध्ये 18.3 मीटर लांबीचे 99 स्पॅन आणि 72.5 मीटर लांबीचा उभा लिफ्ट स्पॅन आहे. हा स्पॅन आवश्यकतेनुसार उंचावून मोठ्या जहाजांना वाट मोकळी करून देतो.
हेही वाचा: नागपुरात रामनवमीची भव्य शोभायात्रा; मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरींची उपस्थिती
जुन्या पुलापेक्षा 3 मीटर उंच असलेला हा पूल अँटी-कॉरोजन तंत्रज्ञान, पॉलिसिलॉक्सेन पेंट, प्रगत स्टेनलेस स्टील, आणि फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिकचा वापर करून तयार केला आहे. यामुळे पूल अधिक टिकाऊ व हवामान बदलाला तोंड देण्यास सक्षम ठरतो.
पंबन ब्रिजचं स्थान फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे. रामायणकथेनुसार, प्रभू श्रीरामांनी रामसेतूचं बांधकाम याच भागात धनुषकोडीजवळ सुरू केलं होतं. त्यामुळे हा पूल हिंदू भाविकांसाठीही श्रद्धेचं प्रतीक ठरतो. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने या पुलाचं बांधकाम केलं आहे. पंतप्रधान मोदींनी 2029 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती आणि अवघ्या 5 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.