Thursday, August 21, 2025 09:53:30 AM

युद्धबंदीनंतरही जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटचे आदेश का देण्यात आले? जाणून घ्या

अचानक रविवारी सायंकाळपासून जैसलमेरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळी, जैसलमेरच्या डीएमने सांगितले की, 'जैसलमेरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट असेल.

युद्धबंदीनंतरही जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटचे आदेश का देण्यात आले जाणून घ्या

जैसलमेर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध तूर्तास थांबले आहे. त्यामुळे युद्धबंदीनंतर सीमेजवळ राहणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, अचानक रविवारी सायंकाळपासून जैसलमेरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळी, जैसलमेरच्या डीएमने सांगितले की, 'जैसलमेरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट असेल. नागरिकांना सकाळनंतरच त्यांच्या घरातील दिवे लावण्यास सांगितले आहे.' युद्धबंदीनंतरही जैसलमेरच्या रहिवाशांना पाकिस्तानकडून धोका कायम आहे.

हेही वाचा: चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा

जैसलमेरचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी (DCM) यांनी माहिती दिली की, 'जैसलमेरमधील सर्व नागरिकांना विनंती आहे की सूचनांनुसार खबरदारी म्हणून आज, रविवार, 11 मे रोजी संध्याकाळी 7:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॅकआउट राहील.' यावेळी प्रत्येकाने आपल्या घरातील आणि आजूबाजूचे दिवे बंद ठेवावेत. जैसलमेरमध्ये यापूर्वीही वीजपुरवठा खंडित झाला आहे, जरी तो जास्त काळासाठी होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शत्रूला त्याचे लक्ष्य सापडत नाही. काळोख आणि अंधार असल्याने लक्ष्य करणे कठीण होते.

हेही वाचा:मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या गोवर्धन गोशाळेचा शुभारंभ

10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपानंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. मात्र, भारताची भूमिका स्पष्ट आहे की, 'जर पाकिस्तानने काहीही करण्याचे धाडस केले तर भारत आणखी कठोर पद्धतीने उत्तर देईल.' रविवारी पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की, 'जर त्या बाजूने गोळीझाडली तर या बाजूनेही गोळीझाडली जाईल.'


सम्बन्धित सामग्री