Sunday, August 31, 2025 11:21:08 AM

पेन्शनसाठी आजीबाईला जावे लागते रांगत

वयोवृद्ध महिला आणि दिव्यांगांना त्यांच्या घरापर्यंत पेन्शन पोहोचविण्याचे निर्देश असतानादेखील ओडिशातील एका ७० वर्षीय आजीबाईंना रांगत पेन्शन घेण्यासाठी जावे लागत आहे.

पेन्शनसाठी आजीबाईला जावे लागते रांगत
AAJI

२५ सप्टेंबर, २०२४, ओडिसा : वयोवृद्ध महिला आणि दिव्यांगांना त्यांच्या घरापर्यंत पेन्शन पोहोचविण्याचे निर्देश असतानादेखील ओडिशातील एका ७० वर्षीय आजीबाईंना रांगत पेन्शन घेण्यासाठी जावे लागत आहे. जवळपास दोन किमीपर्यंत आजीबाईला रांगत जावे लागत आहे. आपल्या घरापासून ते पंचायत कार्यालयापर्यंत रांगत जात असतानाचा या आजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. 
ओडिशा सरकारने अगोदरच वयोवृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन पोहोचविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु, केओंझार जिल्ह्यातील रायसुन गावातील ७० वर्षीय पथुरी देहुरी यांना  पेन्शनसाठी जवळपास दोन किमीपर्यंत रांगत जावे लागते. वृद्धापकाळ आणि शारीरिक व्याधींमुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. तरीही असंवेदनशील अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला पेन्शन घेण्यासाठी त्यांना कार्यालयात बोलावले होते. त्या हाता-पायावर रांगत कार्यालयात जात असल्याच्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने सावरासावरीचा प्रयत्न केला. वृद्धापकाळातील पेन्शन अगोदरच देहुरी यांच्या बँक खात्यावर टाकण्यात आली होती. पण आजारी पडलेल्या देहुरी यांनी बँकेत जाण्यात असमर्थता दर्शवली. यानंतर स्थानिक प्रशासनाने थेट हातीच पेन्शन देण्यास सुरुवात केल्याचे स्पष्टीकरण तेलकोईच्या गटविकास अधिकारी गीता मुर्मू यांनी दिले आहे.
 


सम्बन्धित सामग्री