कोलंबो : मार्क्सवादी विचारांचे अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती झाले. जनता विमुक्ती पेरामुनाने निवडणुकीसाठी पीपल्स लिबरेशन फ्रंट स्थापन केली. या फ्रंटचे नेते असलेले दिसनायके ५५ वर्षांचे आहेत. ते राष्ट्रपती या पदाच्या निवडणुकीत ४२.३१ टक्के मताधिक्क्याने विजयी झाले. राष्ट्रपती या पदासाठी झालेल्या निवडणुकीत ७६ टक्के मतदान झाले. दिसनायके राष्ट्रपती होण्याआधी कोलंबोमधील एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.