Sunday, September 07, 2025 03:22:33 AM

राज्यात २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरले याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

राज्यात २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत सात हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी सात हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. फक्त नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या छाननीचे काम अपूर्ण आहे. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण केली जाईल. ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 


सम्बन्धित सामग्री