Wednesday, August 20, 2025 05:16:59 PM

'बदलापुरा' अक्षयच्या एन्काउंटरवर अमित ठाकरेंची एफबी पोस्ट

अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) नेते अमित ठाकरे यांनी एक एफबी पोस्ट केली.

बदलापुरा अक्षयच्या एन्काउंटरवर अमित ठाकरेंची एफबी पोस्ट

मुंबई : बदलापूरमध्ये शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सोमवारी संध्याकाळी एन्काउंटरमध्ये ठार झाला. अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) नेते अमित ठाकरे यांनी एक एफबी पोस्ट केली. ही एफबी पोस्ट व्हायरल होत आहे. 'बदलापुरा' असे शिर्षक देऊन अमित ठाकरेंनी एफबी पोस्ट केली आहे. पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच; अशी भावना अमित ठाकरेंनी एफबी पोस्टमधून व्यक्त केली आहे. 

नेमके काय घडले ?

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षयला तळोजा कारागृह येथून बदलापूरमध्ये नेत होते. ही प्रक्रिया सुरू असताना अक्षयने पोलिसाचे पिस्तुल खेचून घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाला.

 


सम्बन्धित सामग्री