Buy or Rent House : घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे हा मुख्यत्वे वैयक्तिक आणि भावनिक निर्णय असते. ही स्वतःची आणि कुटुंबाची इच्छा असते, यात काही शंका नाही. परंतु मालमत्तेच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने, घर खरेदी करणे नेहमीच व्यावहारिक नसते किंवा आर्थिक गणितात बसणारे नसते. अशा वेळेस जेव्हा तुम्ही भाड्याने राहता तेव्हा तुम्हाला तुलनेने परवडणाऱ्या किंमतीत चांगले, अधिक प्रशस्त आणि सुसज्ज निवासस्थान मिळू शकते. असे बरेच लोक आहेत, ज्यांना भाड्याच्या घरात राहणे आवडते. कारण, या लोकांना घर खरेदी करायचे नसते. अनेकदा घर करेदी करणे आर्थिक बाजूने शक्य असतानाही भाड्याच्या घरात राहणे हा अधिक स्वस्त आणि व्यावहारिक निर्णय असू शकतो.
भाड्याच्या घरात राहण्याचे फायदे काय आहेत
1. तुम्हाला महागड्या रिअल इस्टेट मार्केट, लांबलचक कायदेशीर प्रक्रिया आणि दर महिन्याला भरावे लागणारे कर्जाचे हप्ते आणि कर्जावर बसणारे अवाढव्य व्याज टाळायचे असेल तर, भाडेकरू असणे हा काही वेळेस चांगला पर्याय असू शकतो.
2. भाड्याने राहण्याचा एक फायदा असा आहे की जर सध्याचा राहणीमानाचा खर्च खूप जास्त असेल आणि तो कमी करायचा असेल तर, तुम्ही लहान घराचा पर्याय निवडू शकता. एखाद्या वेगळ्या परिसरात घर बदलून जाऊ शकता. स्वतःचे घर असताना शक्यतो पटकन असा निर्णय घेतला जात नाही.
3. तसेच, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून भाड्याच्या घराचा भत्ता (HRA) मिळत असेल तर, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
हेही वाचा - कर्जाचा सापळा : क्रेडिट कार्डवरून पैशांची प्रचंड उधळपट्टी; वर्षभरात थकित रक्कम 28 टक्क्यांनी वाढून 6,742 कोटींवर
मालमत्ता देखभालीचा खर्च कमी
तुम्ही भाड्याच्या घरात राहता तेव्हा तुम्हाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला मालमत्ता देखभालीचा खर्च खूप कमी द्यावा लागतो. उदाहरणार्थ, भाडेकरू म्हणून, तुम्हाला भाड्याने घेतलेल्या घराच्या मूलभूत देखभालीसाठी काही शुल्क भरावे लागू शकते. परंतु तुम्हाला मोठ्या दुरुस्ती किंवा नुकसानीची काळजी करण्याची गरज नाही. ही जबाबदारी त्या घराच्या मालकाची आहे. घरमालकाला गृहकर्जासह इतर दुरुस्ती किंवा देखभालीसाठी खर्च करावा लागू शकतो. तसेच, खूप जास्त अडचणी असतील, तर तुम्ही घर बदलण्याचा निर्णय लगेच घेऊ शकता आणि तेथील अडचणींपासून त्वरित तुमची सुटका होऊ शकते. स्वतःच्या घराबाबत असा निर्णय लगेच घेणे शक्य होत नाही.
वारंवार नोकरी बदलणाऱ्यांसाठी आणि बदली होणाऱ्यांसाठी फायद्याचे
भाड्याच्या घरात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचे घर तुमच्या आवडीच्या ठिकाणी बदलू शकता. हे तुम्हाला घर घेण्यापेक्षा अधिक लवचिकता देते. जे लोक वारंवार नोकरी बदलतात त्यांच्यासाठी हे आदर्श आहे. घर रिकामे करण्यापूर्वी भाडेकरूला फक्त एक महिन्याची सूचना अगोदर द्यावी लागते. भाड्याने देण्यासाठी भाडेकरूकडून दीर्घकालीन वचनबद्धतेची आवश्यकता नसते.
घरभाड्यावरील टॅक्स सूटचा फायदा
भाड्याच्या घरात राहण्याचे आर्थिक फायदे देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्ही घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरएचा दावा करू शकता. तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून भाड्याच्या घराचा भत्ता (HRA) मिळत असेल तर, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा मिळतो. तर घरमालकांना मालमत्तेच्या स्थानानुसार वार्षिक मालमत्ता कर देखील भरावा लागतो. तो भाडेकरूंना भरावा लागत नाही.
हेही वाचा - Maruti Suzuki Cars : कार खरेदीदारांना मोठा धक्का! मारुतीने पुन्हा किमती वाढवल्या, एप्रिलपासून गाड्या 4 टक्क्यांनी महागणार
अधिक सुविधा उपलब्ध आहेत
भाड्याने राहण्याचा आणखी एक आर्थिक फायदा म्हणजे, तुम्हाला तुलनेने कमी खर्चात अशा सुविधा मिळतात, ज्या अन्यथा खूप खर्चाच्या ठरतील. स्विमिंग पूल, जिम किंवा स्पोर्ट्स कोर्ट सारख्या सुविधा सहसा मध्यम ते उच्च स्तरीय निवासी सोसायटींमध्ये उपलब्ध असतात. बऱ्याचदा मालमत्ता मालकाने एकाच वेळी देखभाल शुल्क (one time maintenence amount) भरलेले असते, ज्यामध्ये या सर्व सुविधांचा वापर करण्यासाठी मोफत मेंबरशिप देखील समाविष्ट असू शकते.
मोठी आगाऊ गुंतवणूक नाही
मालमत्ता खरेदी करताना, कर्ज घेण्यापूर्वी मालकाला मोठी रक्कम भरावी लागते. शिवाय, मालमत्तेच्या प्रकारावर किंवा जीवनशैलीच्या निवडींवर अवलंबून, मालकाला इंटीरियर डेकोर, फर्निचर इत्यादींवर जास्त खर्च करावा लागतो. स्टँप ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन फी यासारखे प्रॉपर्टी टॅक्स थेट मालकाच्या खिशातून दिले जातात. तर, याची पूर्तता करण्यासाठी भाडेकरूला आगाऊ कोणतीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. भाडेकरूने दिलेला एकमेव आगाऊ खर्च म्हणजे सिक्योरिटी डिपॉझिट, तेही घर रिकामे करताना परत केले जाते.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिली आहे. घराबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)