Meerut Muskan Murdered Saurabh News: मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाच्या आधीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुस्कान रस्तोगी तिचा पती सौरभ आणि मुलगी पिहूसोबत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुस्कानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढला असल्याचे सांगितले जात आहे.
मुस्कानच्या वाढदिवशी, 25 फेब्रुवारी रोजी सौरभ, मुस्कान आणि त्यांची मुलगी पिहू आनंदाने नाचले. कुटुंब आणि मित्रांसोबतचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला, पण सौरभचे हे शेवटचे नृत्य असेल, असा कोणी विचारही केला नव्हता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सौरभ त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत नाचताना दिसत आहे. मुस्कान हसत-हसत नाचत आहे. पण या हास्यामागे एक भयानक क्रूर कारस्थान लपलेलं होतं, ज्याची सौरभला जाणीवही नव्हती.
हेही वाचा - सौरभने पत्नी आणि मुलीसाठी ‘कोफ्ते’ आणले; पण मुस्कानला जराही किंमत नव्हती! बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचे केले 15 तुकडे
मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून आला होता
सौरभ लंडनमध्ये काम करत होता आणि तो पत्नी मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो मेरठला आला होता. शिवाय, त्याला त्याचा पासपोर्ट नूतनीकरण करायचा होता. जेणेकरून, तो लंडनला लवकर परत जाऊ शकेल. पण हे होऊ शकलं नाही. पत्नी मुस्कानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत कट रचून सौरभची हत्या केली. तेव्हाच तिने त्याचा पासपोर्टही लपवून ठेवला.
व्हायरल व्हिडिओमध्ये सौरभच्या शेवटच्या क्षणांची झलक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सौरभ, मुस्कान आणि पिहू आनंदाने नाचताना दिसत आहेत. तो पत्नी मुस्कानचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसोबत अगदी बिनधास्तपणे साजरा करत होता. पण त्याला माहीत नव्हते की, हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा आनंदाचा क्षण असेल. त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिलवर आहे.
निष्पाप पिहूच्या आयुष्यातून हास्य हिरावून घेतले
वाढदिवसानिमित्त सौरभनं पत्नी आणि मुलीसोबत मनसोक्त डान्स केला होता. आई-वडिलांना एकत्र नाचताना पाहून मुलगी देखील खूप खुश होती. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे, तो डान्स शेवटचा ठरला. कारण यानंतर मुस्काननं बॉयफ्रेंडसोबत मिळून सौरभची हत्या केली.
हा दिवस कुटुंबासाठी सर्वात खास असायला हवा होता. वरवर तसंच दिसतही होतं. मात्र, तो काही दिवसांतच शोकात बदलला. त्या दिवशी वडिलांसोबत हसत-खेळत असलेली निष्पाप पिहू आता अनाथ झाली आहे. तिला हेही माहीत नाही की, ती तिच्या वडिलांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाही.
आधी त्याचा पासपोर्ट लपवला, नंतर त्याला मारण्याचा कट रचला!
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ मेरठला आला तेव्हा त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तो परत जाऊ नये, म्हणून आरोपी मुस्कानने त्याचा पासपोर्ट लपवला. जेव्हा सौरभला या कटाची जाणीव सुद्धा नव्हती. तेव्हा खूप उशीर झाला होता. आरोपी तुरुंगात गेल्यानंतरही पोलिसांनी त्यांचा तपास सुरूच ठेवला.
मुस्कानला ड्रग्जचं व्यसन?
माहितीनुसार, सौरभ राजपूत नुकताच लंडनवरून भारतात आला होता. 2016 रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठमध्ये हे जोडपे राहत होते. या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानला तिचा प्रियकर साहिल शुक्लाने व्यसनी बनवलं होतं. गांजा आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे ती प्रियकराला सोडू शकत नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुस्कानला फासावर लटकवा; तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
आता मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिला जगण्याचा काहीही अधिकार नसून तिला फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रमोद कुमार रस्तोगी आणि कविता रस्तोगी यांनी दिली आहे. पालकांनी आपल्या मुलीला पाठिंबा देण्यास नकार दिला. आमचा जावई सौरभने मुस्कानवर मनापासून प्रेम केले. पण तिने त्याच्या प्रेमाची पर्वा केली नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने केला मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा गेम