मुंबई : जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी रिपाईं - आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांनी ही मागणी केली. आरक्षण देताना कोणत्या समाजाचे नागरिक किती प्रमाणात आहेत याबाबत अंदाज व्यक्त करणाऱ्या अहवालांचा आधार घेण्यात आला. नेमका कोणता समाज किती प्रमाणात आहे हे जातनिहाय जनगणनेतूच कळेल, असे रामदास आठवले म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता राहिली. या काळात काँग्रेसने जातनिहाय जनगणना केलेली नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर जनगणनेची वेळ आली तेव्हा कोविड संकटामुळे गणना झालेली नाही. आता जेव्हा कधी गणना होईल त्यावेळी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.