Thursday, September 04, 2025 03:31:06 PM

मुख्यमंत्री शिंदे २४ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार

ठाण्यात २४ तारखेला हे उमेदवार अर्ज भरतील.

मुख्यमंत्री शिंदे २४ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार


मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याचबरोबर राशपचे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव आणि भाजपा नेते संजय केळकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  एकाच दिवशी ठाण्यात तीनही नेत्यांकडून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 

 

आपल्या पक्षातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी राशपचे शरद पवार आणि मनसेचे राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत. पवार आणि राज यांच्या उपस्थितीत अर्ज भरले जाणार आहेत. 
असेल यावेळी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळीही कार्यकर्त्यांच्या गर्दीत शक्तिप्रदर्शन होईल.  


सम्बन्धित सामग्री