Thursday, September 04, 2025 04:54:52 PM

iPhone 17 Series Price: नव्या GST दरानंतर पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या आयफोन 17 ची किंमत किती असेल?

9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.

iphone 17 series price नव्या gst दरानंतर पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या आयफोन 17 ची किंमत किती असेल

iPhone 17 Series Price: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आले असून साबण-शॅम्पू, दूध-दही, एसी-टीव्ही, कार यांसह दैनंदिन वापराच्या वस्तू आता ग्राहकांना स्वस्तात मिळतील. नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत.

दरम्यान, 9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल. मात्र याबाबत स्पष्ट माहिती समोर आली आहे.

आयफोन 17 ची संभाव्य किंमत

काही अहवालांनुसार, भारतात आयफोन 17 मालिकेची सुरुवातीची किंमत सुमारे 84,499 असू शकते. मात्र जीएसटी दरातील बदलांचा या किमतींवर काहीही परिणाम होणार नाही. कारण स्मार्टफोनसाठी जीएसटी आधीपासूनच 18 टक्के स्लॅबमध्ये आहे. या श्रेणीत कोणताही बदल क]रण्यात आलेला नाही. त्यामुळे आयफोनसह सर्व स्मार्टफोनवर पूर्वीसारखाच कर लागू राहील.

हेही वाचा - NPCI Raises UPI Transaction Limit: UPI वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर; आता 5 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार

स्मार्टफोनच्या किमती का बदलणार नाहीत?

पूर्वी देखील स्मार्टफोनवर 18 टक्के कर आकारला जात होता आणि आताही तोच दर लागू राहणार आहे. जीएसटी दरातील सध्याच्या कपातीचा लाभ फक्त त्या वस्तूंनाच होईल ज्या इतर कर श्रेणींमध्ये आहेत. त्यामुळे मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही आणि एसी यांसारख्या वस्तूंमध्ये कोणतीही किंमत कपात झालेली नाही.

सरकारकडे केलेली मागणी - 

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने यापूर्वी सरकारकडे स्मार्टफोनला 5 टक्के कर श्रेणीमध्ये आणण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की मोबाईल फोन आता केवळ लक्झरी नसून सामान्य माणसासाठी गरजेची वस्तू बनले आहेत. जीएसटीपूर्वीही अनेक राज्यांनी मोबाईल फोनला आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत ठेवले होते.

हेही वाचा - ChatGPT Privacy Risks: ChatGPT वापरताना 'या' 5 गोष्टी कधीच शेअर करू नयेत; अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता

सुरुवातीला स्मार्टफोनवर जीएसटी 12 टक्के होता, मात्र 2020 मध्ये तो वाढवून 18 टक्के करण्यात आला. त्यामुळे ICEA ने पुन्हा एकदा दर कमी करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने अद्याप ती मान्य केलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या असल्या तरी iPhone 17 किंवा इतर कोणत्याही स्मार्टफोनच्या किंमतीत कोणतीही घसरण होणार नाही. त्यामुळे आयफोन खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीसारखाच खर्च करावा लागणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री