Wednesday, September 03, 2025 08:22:25 AM

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला. मतदारांना स्लिप वाटण्यावरुन वाद झाला. या वादातून नंतर हिंसा झाली.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा

नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला. मतदारांना स्लिप वाटण्यावरुन वाद झाला. या वादातून नंतर हिंसा झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थकाची स्कॉर्पिओ गाडी फोडण्यात आली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्याचा आरोप गीते आणि त्यांच्या समर्थकांनी केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर गीतेंनी भाजपाचे उमेदवार आणि नाशिक पूर्वचे सध्याचे आमदार राहुल ढिकले यांनी धमकी दिली. 'निवडणुका येत - जात राहतात पण गुंडगिरी खपवून घेणार नाही' या शब्दात गीतेंनी ढिकलेंना धमकी दिली. 

काही दिवसांपूर्वी नाशिक पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले आणि गणेश गीते समर्थक आमनेसामने आले होते. हा वाद थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत गेला होता. आता पुन्हा एकदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. 

भाजपाचे कार्यकर्ते गुंडगिरी करुन दहशत निर्माण करत आहे. पराभवाची भीती वाटू लागल्यामुळे मतदारांना आणि विरोधकांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या गुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही, असे गीते म्हणाले. 

कमलेश बोडकेंना नोटीस

पोलिसांनी भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांना मतदानाच्या दोन दिवस आधी तडीपार केले आहे. गीतेंचा नातलग असल्यामुळे ढिकलेंनी पोलिसांवर दबाव टाकून तडीपार करण्यासाठीची नोटीस बजावली, असा आरोप कमलेश बोडके यांनी केला.


सम्बन्धित सामग्री