Thursday, September 04, 2025 07:39:23 PM

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसची रणनीती

काँग्रेस कार्यकारिणी समिती पत्रकार परिषद घेणार आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसची रणनीती

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी समिती पत्रकार परिषद घेणार आहे. दादर येथील टिळक भवनात सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. 

 

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती आखली जाणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


सम्बन्धित सामग्री