गजरा हा महिलांचे सौंदर्य वाढवतो असं म्हणतात. गजरा माळल्याने महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पण तुम्हाला माहितीय का गजरा माळण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. त्यावर सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच. तर काय आहेत गजरा माळण्यामागे शास्त्रीय कारण जाणून घेऊयात..
काय आहे गजरा माळण्यामागे शास्त्रीय कारण?
1. गजराच्या सुवासाने महिलांचं मनाला शांती मिळते. अतितणावामुळे झोप येत नसेल तर गजऱ्यामुळे फायदा मिळतो.
2. शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो.
3. केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो.
4. केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्यापासून गजरा लावल्याने मुक्तता मिळते.
5. फुलांची राणी असलेल्या चमेलीपासून मोगरा, जुईपर्यंत गजरा केसात माळल्यास महिलांचं सौंदर्य खुलून दिसतं.
6. हिंदू धर्मात गजराचे विशेष महत्त्व असून शुभ कार्यात गजऱ्याशिवाय विधी पूर्ण होत नसतात.
काय आहेत गजऱ्याचे वैशिष्ट्य?
गजरा म्हणजे फुलांच्या छोट्या माळेसारखे केसांत माळायचा आभूषणाचा प्रकार असतो. दक्षिण आशिया व आग्नेय आशियात हे केशाभूषण सहसा स्त्रियांमध्ये प्रचलित असलेल्या वेणी, अंबाडा इत्यादी केशरचनांमध्ये गुंफले जाते. गजरा बहुतेक करून मोगरा या फुलाचा असतो. तसेच या मध्ये अबोली या फुलांचा वापर करतात.
गजरा ही फुलांची एक माळ आहे जी दक्षिण आशियातील महिला सणाच्या प्रसंगी, विवाहसोहळ्यांमध्ये किंवा दररोज पारंपारिक वेषभूषा म्हणून घालतात. ते सहसा गुलाब, मोगरा, चमेली, अबोली इत्यादी वेगवेगळी फुले वापरून बनवली जातात. हे केसांच्या जुडयावर किंवा वेणीला गुंफुन परिधान केले जाऊ शकतात. दक्षिण आशियातील महिला सहसा गजरा हा पारंपारिक पोशाखा बरोबर घालतात. दक्षिण आशियातील स्त्रिया प्रामुख्याने सणाच्या प्रसंगी आणि लग्नाच्या वेळी मनगटात सुद्धा गजरा घालतात. परंतु गजरा हा अलंकार पूर्णपणे केशरचना सजवण्यासाठी वापरला जातो.