Monday, September 01, 2025 09:27:35 AM

'आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा'

अबू आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा पडल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा

मुंबई : अबू आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा पडल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. निवडणुकीत जिंकून आलो तर ड्रग्ससह मानखुर्द शिवाजीनगरमधील नागरिकांच्या सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू असे नवाब मलिक म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. 

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी मागील पंधरा वर्षांपासून मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अबू आझमी यांच्या विरोधात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक निवडणूक लढवत आहेत.


सम्बन्धित सामग्री