Thursday, September 04, 2025 08:56:54 AM

दसऱ्याला राजकीय विचारांची उधळण

महाराष्ट्रात शनिवारी दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय विचारांची उधळण होणार आहे.

दसऱ्याला राजकीय विचारांची उधळण

मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय विचारांची उधळण होणार आहे. दिवसभरात सहा मोठे राजकीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांतून राजकीय भाषणांची विजयादशमीला बरसात होणार आहे. लवकरच राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून तयारी करत असलेल्या राजकीय नेतृत्वाची दसऱ्यापासून कसोटी लागणार आहे. 

दसऱ्याला असलेले प्रमुख राजकीय कार्यक्रम

  1. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा - मुख्य वक्ते सरसंघचालक मोहन भागवत
  2. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरेंचे पॉडकास्ट
  3. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातले सावरगाव - मुख्य वक्ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
  4. बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मेळावा - मुख्य वक्ते मनोज जरांगे
  5. मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा - मुख्य वक्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  6. मुंबईत शिवाजी पार्कवर शिउबाठाचा दसरा मेळावा - मुख्य वक्ते उद्धव ठाकरे

सम्बन्धित सामग्री